फलटण | फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक नंदकुमार आबाजी भोईटे यांचे लेह- लडाख येथे निधन झाले. शुक्रवारी दि. 27 रोजी त्यांचे झटक्याने निधन झाले. नंदकुमार भोईटे यांचा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते. त्यांच्या अकाली निधनाने फलटण शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
नंदकुमार भोईटे सलग 35 वर्षे नगर परिषदेत निवडून आलेले होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या नंदकुमार भोईटे यांनी कायम गरजवंतांना मदतीचा हात पुढे केला होता. आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, कोरोना काळातील गरजू नागरिकांना मदत, सजाई गार्डन येथे 100 बेडचे सुरु केलेले कोरोना केअर सेंटर यातून त्यांच्यातील दानशूरपणा फलटणकरांनी सातत्याने अनुभवला होता.
दरम्यान, त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी फलटण येथे शनिवारी (दि.28) आणण्यात येणार आहे. नंदकुमार भोईटे हे राष्ट्रवादी पक्षाचे व रामराजे नाईक- निंबाळकर यांचे विश्वासू होत.