पिकअप गाडीचा अपघात ! दोन चिमुरड्यांसह एका महिलेचा मृत्यू

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे पिक अप गाडी तीव्र उतारावरुन मागे दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांसह एका महिलेचा मृत्यू आहे.

नेमके काय घडले ?
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मोदलगाव या ठिकाणी हा भीषण अपघात घडला आहे. यावेळी एक पिकअप गाडी मजुरांना घेऊन जात होती. यावेळी अचानक चालकाचे पिकअप गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. हि गाडी उतारावरून घसरल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत.

मृतांमध्ये दोन चिमुरड्यांसह एका महिलेचा समावेश आहे. या अपघातानंतर जखमींना तातडीने धडगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे सर्व मजूर गोरांबा या गावचे रहिवाशी आहेत. हे सर्व मजूर नंदुरबार या ठिकाणी जात असताना हा अपघात घडला.

You might also like