Saturday, March 25, 2023

युवतीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला न्यायालयीन कोठडी

- Advertisement -

औरंगाबाद :  वाढदिवसाच्या पार्टीत काढलेल्या फोटोवरून ब्लॅकमेल करत युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी.  तारे यांनी या प्रकरणी आदेश दिले आहेत.

शेख सरताज शेख आरीफ (२२, रा. छावणी) असे आरोपीचे नाव असून,  त्याला १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.  प्रकरणात २४ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली.  त्यानुसार,  फिर्यादीच्या बहिणीची आरोपीशी ओळख होती.  आरोपीने ३ जानेवारी २०२० रोजी वाढदिवसासाठी त्या युवतीला बोलावून घेतले आणि त्यावेळी काढलेल्या फोटोवरून तिला ब्लॅकमेल करणे सुरू केले.  त्याने ७ ऑगस्ट रोजी तिच्यावर अत्याचार केला.

- Advertisement -

तसेच  ११ मार्च २०२१ रोजी तिच्याकडून दोन-तीन कागदांवर स्वाक्षऱ्या घेतल्या.  त्यानंतर आरोपीच्या वडिलांनी ८ एप्रिल रोजी फिर्यादीच्या घरी येऊन,  दोघांचा विवाह झाल्याचे सांगितले.  त्यावेळी आरोपीने फसवून विवाह केल्याचे सर्वांच्या लक्षात आले.  या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.