Sunday, May 28, 2023

लवकीनदीत आढळला नारायण महाराज यांचा मृतदेह; अपघात की घातपात अस्पष्ट

औरंगाबाद | एका 45 वर्षीय महाराजाचे मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आल्याची घटना आज सकाळी लिंबेजळगाव येथील शनीमंदिर नजीकच्या लवकी नदी मध्ये समोर आली. नारायण महाराज असे मृताचे नाव आसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की,आज सकाळी लिंबे जळगाव येथील शनिमंदिर जवळून वाहणाऱ्या लवकी नदी मध्ये नागरिकांना मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून शविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलविला.मृताची ओळख पोलिसांनी पटविली.

मृताचे नाव नारायण महाराज असल्याची प्राथमिक माहिती आहे.पोलिसांनी महाराज यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला आहे. ते कधी पासून बेपत्ता होते. त्यांच्या सोबत काही अनुचित प्रकार घडला की मग अपघाती ते पाण्यात पडून गतप्राण झाले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यू खरे कारण समोर येणार आहे.मात्र परिसरात या घटने बाबत अनेक चर्चेना उधाण आले आहे.