हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l कोरोनाने देशात थैमान घातलं आहे. देशात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अस असताना कोरोणाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे ल पूर्ण होत आहे. दरम्यान इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मुर्ती यांनी लॉकडाउनवर काळजी व्यक्त केली आहे. “लॉकडाउन पुढेही सुरू राहिल्यास करोनामुळे नाही तर उपासमारीमुळे भारतात जास्त मृत्यू होतील,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
करोना हा बाकी आजारांप्रमाणेच आहे. असा विचार करून तो आपण आता स्वीकारायला हवा आणि लोकांना कामावर येण्यास परवानगी द्यायला हवी. तसच याचा संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता असणाऱ्यांची काळजीही घ्यायला हवी, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
आता पुन्हा लॉक डाऊन वाढेल की संपेल हे अजुन माहीत नाही. त्यामुळे देशातील उद्योगधंदेही सुरू होतील की नाही हे अजुन सांगता येत नाही. याचा संपूर्ण परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. तसेच सद्यस्थितीत गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोनाने नाही तर लॉक डाऊन ने नागरिकांचे मृत्यू होतील अशी भीती नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली आहे.