हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुशांतसिंग रजपूत आत्महत्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुशांत प्रकरणी अनेक पुरावे देऊनही केवळ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून त्यांना अटक केली नाही असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. सावंतवाडी येथील कार्यकर्ता मेळाव्यात राणे बोलत होते.
सुशांतला काय गरज होती आत्महत्या करायची? आम्ही अनेक पुरावे दिले, मी दिले. त्या रात्री काही लोक गेले त्याच्या घरी, ते बोलत असताना तो उलट बोलला. दिशा सॅलियनची हत्या याच लोकांनी केली होती. तो बोलला मी ते विसरु शकत नाही. कारण दिशा सॅलियन त्याची मैत्रीण होती. तिला आठव्या माळ्यावरुन फेकलं खाली. अत्याचार केला चार पाच जणांनी. त्यामुळे तो म्हणाला मी हे माफ करणार नाही. त्यामुळे ते चिडले आणि त्याला बाथरुममध्ये ठार मारलं. आम्ही सगळे पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, अटक नाही. दिशा सॅलियन हत्या, कुणाला अटक नाही,” असं नारायण राणे म्हणाले.
तसेच पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी पराक्रम केला, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर किती मर्डर पचवणार हे सरकार? असा तिखट सवाल राणे यांनी उपस्थित केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरही राणे यांनी भाष्य केले. एसटीच्या खासगीकरणावरून उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले आहे.