नारायण राणे अखेर पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चिपळूण | मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारताच त्यांची तब्येत बिघडलेली आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नारायण राणे यांना बिपी आणि शुगर वाढली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जठार यांनी दिली आहे. नारायण राणे त्यांच्या गाडीतून आपल्या नितेश आणि निलेश यांच्यासोबत बाहेर पडलेले आहे. नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

केंद्रीय नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीपासून राज्यात शिवसैनिकांच्यात पडसाद उमटू लागले होते. त्यानंतर सकाळपासून आज कोकणात भाजपाची जन आशीर्वाद यात्रा सुरू होण्या अगोदर नाशिक पोलिसांच्याकडून अटकेची शक्यता वर्तविली गेली होती. मात्र भाजपाकडून व शिवसैनिकांकडून तसेच राणे समर्थकांच्याकडून त्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली होती. त्यामुळे अटक होणार का याविषयी तर्कविर्तक वर्तविले जात होते. राज्यात अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यालयावर तसेच पोस्टरवर दगडफेक व शाई फेकीच्या घटना घडल्या आहेत.

नारायण राणे केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांना अटक होईल की नाही याविषयी लोकांच्यात संभ्रमवास्था होती. परंतु दुपारी नाशिक पोलिस यांची टीम कोकणात दाखल झाली होती. तसेच दुपारीच नारायण राणे यांच्या मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर नारायण राणे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणेंना ताब्यात घेतले आहे. यावेळी राणेंच्या कार्यकर्त्यांनी पोलिस गाडीच्या आडवे झोपून गाडी अडविण्याचाही प्रयत्न केला आहे.

Leave a Comment