नारायण राणेंना न्यायालयाकडून जामीन मंजूर

Narayan Rane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांना रायगड दंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरु होती. कोर्टाकडून नारायण राणे यांना दिलासा मिळणार की पोलीस कोठडी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. रात्री उशिरा रायगड दंडाधिकाऱ्यांकडून जामीन मंजूर केला आहे.

खंडपीठाचे प्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या समोर सुनावणी झाली. अँड. अनिकेत निकम यांनी नारायण राणे यांची बाजू मांडली. नारायण राणे यांनी जामिनाची मागणी केली होती तर पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. कोर्टाच्या बाहेर नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे, मुले नितेश राणे व निलेश राणे कुटुंबीय उपस्थित होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान सोमवारी रायगड जिल्ह्यात केले होते. भाजपाची जन आशीर्वाद यात्रेदरम्यान हे वक्तव्य केल्यानंतर मंगळवारी दिवसभर शिवसेना आणि राणे समर्थकांच्यात राज्यात वादावादीच्या घटना घडल्या आहेत. राणेंना दुपारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर रायगड दंडाधिकाऱ्यांकडून सुनावणी रात्री उशिरा करण्यात आली. प्रकृतीच्या कारणास्तव जामीनाची मागणी राणेंच्या वकींलाकडून करण्यात आली होती.