Friday, June 2, 2023

बाळासाहेबांची शिवसेना ही आता ब्या ब्याsss करणारी बकरीसेना झालीय ; राणेंनी पुन्हा डिवचलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. नुकतीच पुण्यातील सभेतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकाही केली. आता त्यांच्यानंतर भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेव्हर टीका करत पुन्हा डिवचले आहे. “उद्धव ठाकरे बोलतो काय? करतो काय? हेच कळत नाही. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून ती आता म्याव-म्याव, ब्या ब्याsss, बकरीसेना झाली आहे, अशी टीका राणेंनी केली आहे.

मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मालवण देवबागमधील बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांची असणारी शिवसेना काय होती. आणि आता त्यांची शिवसेना काय झाली आहे. या सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय करतायत हेच कळत नाही. उद्धव ठाकरे काय बोलतो? काय करतो? असा सवाल विचारत बाळासाहेबांची शिवसेना हि आता शिवसेना राहिली नसून ती बकरीसेना झाली आहे.

शिवसेनेवर टीका करताना नारायण राणे यांनी केंद्र सरकारबद्दल महत्वाचे विधान केले. यावेळी ते म्हणाले की, केंद्रात आणखी 50 वर्षे भाजपचीच सत्ता राहणार आहे. सर्व जाती, धर्माच्या व्यक्तींना भाजप पक्ष आपल्यात सामावून घेत आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात भाजपचा जनाधार वाढत आहे, असे राणे यांनी म्हंटले आहे.