उद्धव ठाकरे आयत्या बिळावरील नागोबा; नारायण राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यवर आणि भाजपवर आज जोरदार टीका केली. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बाळासाहेबांच्या गुणांचे मुल्यमापन कुणी करू नये. त्यांनी शिवसेना पुढे नेली, राज्यात सत्ता आणली, भोळे म्हणून नाही, त्यांना माणूसकी होती. मात्र, बाबरी मस्जिद पडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, 1 टक्का तरी उद्धव ठाकरे यांचे योगदान आहे का? एक दिवस जेलमध्ये तरी गेले आहेत का? उद्धव ठाकरे आयत्या बिळावरील नागोबा आहेत. शरद पवारांच्या आशीर्वादाने तेवढे बस, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

आज महाराष्ट्र दिनी मंत्री राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी राणे म्हणाले की, आज महाराष्ट्राने जी प्रगती केली, त्या प्रगतीत जास्त वाटा हा मुंबईचा आहे आणि तो 34 टक्के आहे. बाळासाहेबांच्या गुणांचे मुल्यमापन कुणी करू नये, ते कर्तृत्ववान होते. त्यांनी शिवसेना पुढे नेली, राज्यात सत्ता आणली, भोळे म्हणून नाही, त्यांना माणूसकी होती, कडवट हिंदुत्व आणि मराठी माणूस याद्वारे त्यांनी वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांनी कमावलेले काहींना ते टिकवता आलेले नाही.

उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे मूल्यमापन करण्याची नैतिकता नाही, मुख्यमंत्री म्हणून आज महाराष्ट्र दिनी लोकांना देण्यासारखे त्यांनी बोलावे. वास्तविक पाहता ते मुख्यमंत्री पदावर शोभतही नाही आणि त्यांना तसे जमतही नाही, असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “माझ्यावर आरोप होतो की ही शिवसेना बाळासाहेबांची नाही, मी म्हटलं हो बरोबर आहे. बाळासाहेब ठाकरे भोळे होते. त्यावेळी भाजपाने बाळासाहेबांना वेळोवेळी कसे फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळेच मी भाजपासोबत धुर्तपणे वागत आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.