केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नुकतेच मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानकपणे हृदयाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

नारायण राणे यांना गेल्या काही दिवसांपासून ह्रदयाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना आज मुंबईतील रुग्णालयात रुटीन चेकपसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर  अँजिओग्राफी करण्यात आली. तसेच काही ब्लॉकही आढळले. यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. यावेळी एक स्टेनही टाकण्यात आलेला आहे.

दरम्यान, राणे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आणखी तीन चे चार दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.