नारायण राणे, नितेश राणे यांना जामीन मंजूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी राणे पिता पुत्रांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला.

दिशा सलियन प्रकरणी राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत आज दिंडोशी न्यायालयात ही सुनावणी पार पडली आहे. यावेळी सुनावणीनंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांना जामीन मजूर करीत कोर्टाकडून दिलासा देण्यात आला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे व नितेश राणे यांनी सालियन हिच्या मृत्यूसंदर्भात काही वक्तव्य केली होती. त्यानंतर दोघांच्या विरोधात दिशा सालियनच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दोन्ही पक्षकारांमध्ये काल युक्तिवाद पार पडला. युक्तिवादानंतर सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. याबाबत आज निर्णय देण्यात आला.