पोलिसांवर एका मंत्र्याचा दबाव असल्याने नारायण राणेंच्या जीवाला धोका : प्रसाद लाड

चिपळूण | नारायण राणेंना जेवणावेळी धक्काबुकी केली. आता त्यांना कुठे नेले यांची माहिती दिली जात नाही. नारायण राणे हे 65 वर्षाचे असून अशा जेष्ठ नागरिकांना पोलिस त्रास देत आहेत. एसपी आणि पोलिसांच्यावर एका मंत्र्याचा दबाव असल्याने नारायण राणेंच्या जीवाला धोका असल्याचा आरोप भाजपचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणावेळी त्यांना जेवणावरून उठवून पोलिसांनी धक्काबुकी केली आहे. त्यामुळे राज्यात हुकुमशाही आहे का असा सवाल प्रसाद लाड यांनी केला आहे. तसेच पत्रकारांना नारायण राणे हे जेवत असतानाचा व्हिडीअोही दाखवला आहे.

नारायण राणेंना रूग्णालयात दाखल केले जावू शकते. कारण राणेंचा ब्लडप्रेशर वाढलेला असल्याची माहिती तपासणी करणऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांना रूग्णालयात दाखल करावे लागणार असल्याचेही सांगितले आहे.

You might also like