हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी भाजपनेते नारायण राणे यांनी शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतरआज प्रत्यक्ष खात्याची जबाबदारी नारायण राणे यांनी स्वीकारली. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावे ते म्हणाले कि, मोदींनी माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवणार आहे. देशाचा जीएसटी वाढवण्यात हातभार लावणार, खात बरे वाईट नसते, त्यासाठी काम कसे करायचे असते ते महत्वाचे असते, असे म्हणत यावेळी राणेंनी राऊतांना टोला लगावलेला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी नारायण राणे यांच्या मंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिलीहोती. ते म्हणाले होते कि, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उंची हि त्यांच्या पदापेक्षाही मोठी आहे. राणे यांनी महाराष्ट्राचे एकेकाळी मुख्यमंत्री पद संभाळलेलं आहे. मंत्रीपदे हि देशाची सेवा करण्यासाठी दिली जातात. त्यावर राणे यांनी हे उत्तर दिले.
यावेळी राणे म्हणाले कि, मला शपथविधी होण्याअगोदर अनेकांचे शुभेच्छाचे फोन आले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मला फोन करून शुभेच्छा दिल्या. मात्र, काहींनी शुभेच्छा दिल्या माहिती त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानींचाही समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मन मोठं नसल्यामुळेच त्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत, असे राणे यांनी यावेळी म्हंटल.