२०१९ची निवडणूक आम्ही विक्रमी जागांनी जिंकणार – नरेंद्र मोदी

Narendra Modi
Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | २०१९ची निवडणूक विक्रमी जागांनी जिंकणार आहोत कारण आम्ही केलेल्या कामावर आमचा विश्वास आहे. जनतेला भक्कम आणि निर्णायक सरकारची गरज आहे म्हणून जनता आमच्या पाठीशी उभी राहील असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला इमेल द्वारा दिलेल्या मुलाखतीतून मोदी व्यक्त झाले आहेत.
मॉब लिंचिंग च्या मुद्द्यावर आम्ही गंभीर आहोत आणि हा प्रकार रोखण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत असे मोदी मुलाखतीत म्हणाले आहेत. आसामच्या एनआरसी मुद्द्यावर मोदींनी कॉग्रेसची चांगलीच खरडपट्टी काढली असून कॉग्रेसचे सरकार आसाम मध्ये असताना त्यांनी एनआरसी मुद्द्यावर काहीच कार्यवाही केली नाही असा आरोप ही मोदींनी केला आहे.