Sunday, March 26, 2023

थालीनादनंतर पंतप्रधान मोदींचे १३० कोटी भारतीयांना नवे चॅलेंज, घरातील लाईट बंद करुन हातात मेणबत्ती घेऊन करायचं ‘हे’ काम

- Advertisement -

दिल्ली | पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी १३० कोटी भारतीया़ंना थालीनादनंतर आता नवे चेलेंज दिले आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट बंद करुन घराच्या दारात मेणबत्ती घेऊन ९ मिनिटांसाठी उभे राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केले आहे.

- Advertisement -

५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुम्हा सर्वांचे ९ मिनिट हवे आहेत. यावेळी तुम्हाला सर्वांना आपल्या घरातील सर्व लाईट बंद करुन हातात मेणबंत्ती घेऊन दारात नऊ मिनिटांकरता उभे रहायचे आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. कोरोनाला आपण प्रकाशाची ताकद दाखवून देऊ असे म्हणत मोदींनी आपण सर्वजण कोरोनाशी एकत्र लढा देत आहोत हे दाखवण्यासाठी आपणाला हे करायचे असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, मेणबत्ती इव्हेंटवेळी नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये असेही मोदींनी सांगितले आहे. यावेळी रामायणाचे स्मरण करावे असं मोदी म्हणालेत. कोरोना विरुद्ध आपण एकटे लढत नसून १३० कोटी भारतीय आपण एकत्र कोरिनाशी लढा देत आहोत असे मोदी म्हणालेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

कराडचा दोन दिवसांचा जनता कर्फ्यू सीओंवरच उलटला

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळ कोरोना पॉझिटीव्ह

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता