नाशिक प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेच्या सांगता करण्यासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हटवल्याचा उदो उदो केला आहे. रक्ताने रंजीत झालेल्या कश्मीरला आपण आता तयार करायाचे आहे. आम्ही आमच्या सरकारच्या १०० दिवसांचा चमत्कार दाखवला आहे अशा शब्दात नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय मुद्दयांवरच भाषण दिले आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय मुद्द्यांना धरून प्रचार केला. त्याच धरतीवर त्यांनी महाराष्ट्रात प्रचाराची सुरुवात केल्याचे आज नाशिकच्या सभेत पाहण्यास मिळाले. त्याच प्रमाणे भारत संरक्षण सिद्ध कास बनत चांगला आहे याचा पाढाच मोदींनी वाचून दाखवला भारतात बुलेटप्रुप जॅकेट देखील बनवली जात आहेत. त्यातून भारत फक्त आपल्याच सैनिकांचे प्राण वाचवत नाही. तर त्या जॅकेटांची करत आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
दरम्यान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विरोधकांवर सौम्य हल्ला देखील केला आहे. शरद पवारांना भारतापेक्षा पाकिस्तान जवळचा वाटत आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे शरद पवार मतांच्या फायद्यासाठी आमच्या सरकारावर टीका करत आहेत असे देखील नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.