हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे जेव्हा जेव्हा परदेशी दौऱ्यावर जातात तेव्हा तेथील पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांना आवर्जून मिठी मारतात. आत्तापर्यंत आपण असे अनेक फोटो बघितले असतील ज्यामध्ये मोदींनी पुतीन पासून ते ऋषी सुनक आणि जो बायडन पर्यंत सर्व बड्या नेत्यांना मोदींनी मिठी मारली आहे. सध्या मोदी युक्रेन या देशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या भेटीवेळी मोदींनी झेलेन्स्की याना मिठी मारली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. मोदी नेहमी सर्व परदेशी नेत्यांना मिठी का मारतात असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला, ज्याचे उत्तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिले आहे. मिठी मारणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे असं एस जयशंकर यांनी सांगितलं.
वोलोदिमिर झेलेन्स्की आणि नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी भेट झाली. या भेटीसाठी मोदी पोहोचले तेव्हा भेटल्यानंतर त्यांनी आधी हस्तांदोलन केलं. त्यानंतर मोदींनी वोलोदिमिर झेलेन्स्की यांना मिठी मारली. ६ महिन्यापूर्वी मोदींनी युक्रेनचा कट्टर विरोधक असलेल्या व्लादिमीर पुतिन यांनाही मिठी मारली होती. त्यावरून एका पाश्चात्य पत्रकाराने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, जेव्हा आमच्या भागात लोक भेटतात तेव्हा एकमेकांना मिठी मारतात, हा कदाचित तुमच्या संस्कृतीचा भाग नसेल, मात्र आमच्या संस्कृतीचा भाग आहे. आज मी बघितलं कि मोदींनी झेलेन्स्की याना मिठी मारली.
एस जयशंकर पुढे म्हणाले, मी मोदींना जगातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांना मिठी मारताना पाहिलं आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की या शिष्टाचारांच्या अर्थांसंदर्भात तुमच्याकडे आणि आमच्याकडे थोडा संस्कृतिक फरक आहे,” असं सांगितलं. दरम्यान, मोदींनी आत्तापर्यंत जो बायडेन, डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन, रऋषी सुनाक, यांच्यासह इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या सर्वोच्च नेत्यांनाही मोदींनी अशाप्रकारे मिठी मारल्याचं यापूर्वी पाहायला मिळालं आहे. त्यामुळे मोदींची मिठी ही नेहमीच चर्चेत ठरते.