पंतप्रधान मोदी 6223 मतांनी पिछाडीवर; वाराणसीत मोठा उलटफेर??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दुसऱ्या फेरीअखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून पिछाडीवर दिसत आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मोदी (Narendra Modi) तब्बल ६२२३ मतांनी पिछाडीवर आहेत, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मोदींविरोधात काँग्रेसच्या अजय झा यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे.

2019 मध्ये मोदींनी वाराणसी (Varanasi) मधून एकतर्फी लढत जिंकली. त्यावेळी सपाच्या शालिनी यादव दुसऱ्या तर काँग्रेसचे अजय राय तिसऱ्या क्रमांकावर होते. 2019 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना 6 लाख 74 हजार 664 मते मिळाली होती. आताही मोदी पुन्हा एकदा वाराणसी मधून निवडणुकीच्या रिंगणात होते. संपूर्ण देशात मोदींचा जलवा असल्याने वाराणसी मधूनही मोदी मोठ्या फरकानं विजयी होतील असं अंदाज होता, मात्र आता मोदीच ६२२३ मतांनी पिछाडीवर गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे वाराणसीत मोठा उलटफेर पाहायला मिळणार का हे बघायला हवं.

दरम्यान, INDIA आघाडी आणि NDA मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. NDA २८७ जागांवर आघडीवर आहे तर INDIA आघाडी २१७ जागांवर पुढे आहे. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात INDIA आघाडीला मोठं यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रात तब्बल २८ जागांवर INDIA आघाडीवर आहे तर उत्तर प्रदेशात सुद्धा ३५ जागांचा टप्पा INDIA आघाडीने पार केला आहे.