तिरुअनंतपूरम | केरळमधे अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवण विस्कळीत झाले आहे. मृतांचा आकडा ३२४ वर गेल्याचे वृत्त असून पूरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी केरळ दौर्याचे नियोजन केले असून ते तिरुअनंतपूरम मधे दाखल झाले आहेत.
विविध सामाजिक संस्था, पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफ मदत कार्यात सहभागी झाले असून आत्तापर्यंत लाखो नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी आज ट्विटर वरुन परिस्थितीचा आढावा दिला आहे.