भारताची सलग आठव्यांदा UNSC च्या अस्थायी पदी निवड; पंतप्रधान मोदी म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवडणुकीत भारताची सलग आठव्यांदा अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे. बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भारताला 192 पैकी 184 मतं मिळाली. यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी सर्व देशांचे आभार मानले आहेत. भारत जगात शांती, सुरक्षा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम करेल असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

2021-22 या कालावधीसाठी भारत आशिया आणि पॅसिफिक प्रवर्गातून अस्थायी जागेसाठी उमेदवार होता. आशिया-पॅसिफिक गटाने भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला. यामध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्यासह 55 सदस्यांचा सामावेश होता. ज्यामुळे भारताची निवड बिनविरोध झाली. कॅनडाला मात्र UNSC मध्ये स्थान मिळू शकलं नाही.

भारताला एकूण 192 मतांपैकी 184 मतं मिळाली. 2020-2022 दोन वर्षासाठी भारताची निवड झाल्याचा आनंद आहे.संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे अशी प्रतिक्रिया UNSCमधील भारताचे प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी दिली आहे.

Leave a Comment