Thursday, February 2, 2023

पंतप्रधान मोदींनी वाहिली पाकिस्तानच्या विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली 

- Advertisement -

नवी दिल्ली । पाकिस्तान मध्ये आज एक विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये बरीच जीवित आणि वित्त हानी झाली आहे. काराचीजवळ झालेल्या या अपघातामुळे पाकिस्तान अतिव दुःखात आहे. त्यांच्या या दुःखाचे सांत्वन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून पाकिस्तानवर कोसळलेल्या दुःखाचे सांत्वन केले. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल आम्हांला संवेदना आहेत. तसेच जखमींचे आरोग्य लवकर सुधारो अशा प्रार्थना आहेत. असे त्यांनी ट्विट मध्ये म्हण्टले आहे. 

आज दुपारी पाकिस्तानच्या कराची शहराजवळ प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. PK८३०३ हे पाकिस्तानी विमान लाहोरहुन कराचीला निघाले होते. दुपारी १ वाजता हे विमान लाहोरहून निघाले होते. मात्र कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याआधीच हे विमान रहिवाशी भागात कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.कराची विमानतळापासून जवळ असणाऱ्या जिना गार्डन परिसरात मॉडेल कॉलनी येथे हे विमान कोसळले आहे.या विमानात एकूण ९९ लोक होते यामध्ये ९१ प्रवासी आणि ८ क्रू सभासद होते.  

- Advertisement -

दरम्यान पाकिस्तानातील कराची हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे तसेच जिना आतंरराष्ट्रीय विमानतळ हे नेहमी गजबलेले असते. कोरोनाच्या संक्रमणामुळे पाकिस्तानात संचारबंदी लागू करण्यात आली होती. संचारबंदी उठवल्यानंतर विमान वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली होती. एअरक्राफ्ट क्रश रेकॉर्ड या संस्थेच्या माहितीनुसार आतापर्यंत पाकिस्तान मध्ये ८० विमान दुर्घटना झाल्या आहेत. २८ जुलै २०१० आणि २० एप्रिल २०१२ च्या अपघातानंतरचा हा मोठा अपघात असल्याची माहिती या संस्थेने दिली आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1263815469145788416