हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीमध्ये NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आज NDA ची सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे NDA च्या नेतेपदी निवड करण्यात आली. पुढे नरेंद्र मोदींच्या शपथविधीची ही तारीख ठरवण्यात आली. त्यानुसार येत्या 9 जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा 9 जूनला 6 वाजता पार पडेल.
आज एनडीएची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित आहेत. या बैठकीच्या सुरुवातीलाच राजनाथ सिंह यांनी NDA च्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवला. हा ठराव मंजूर होताच नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.
दरम्यान, NDA च्या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “एनडीएवर देशाचा अढळ विश्वास आहे. आता लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. गेल्या 10 वर्षात केलेले काम हा फक्त ट्रेलर आहे. आता आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आहे. आम्ही आमच्या पूर्वीच्या कामाचे सर्व रेकॉर्ड मोडावेत अशी जनतेची इच्छा आहे.