मोदींच्या लसीकरणाचे ‘इलेक्शन कनेक्शन’ ?? ; आसामी गमछा आणि केरळ-पुद्दुचेरीच्या नर्स ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली. आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवूया अस आवाहन यावेळी मोदींनी केलं. दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी यांचा पेहराव आणि काही ‘योगायोगांमुळे’ त्यांनी प्रतिकात्मक राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

मोदींच्या या लसीकरणादरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये येऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकींसंदर्भातील काही कनेक्शन यावेळी दिसून आले. मोदींनी गळ्यामध्ये आसामी लोकांची ओळख आणि प्रतिक मानला जाणारा गमछा घातला होता. हा गमछा त्यांना काही आसामी महिलांनी भेट दिला होता. मोदींसोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या नर्सपैकी एकजण पुद्दुचेरीची तर दुसरी केरळची आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये आसाम, पुदुचेरी आणि केरळचा समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पेहराव आणि इतर ‘योगायोग’ प्रतिकात्मक राजकारणाचा भाग असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारुन चालणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment