मतदान संपताच मोदींचे खास ट्विट; INDIA आघाडीवरही साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच्या सर्व ७ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून ४ जूनला जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष्य आहे. तत्पूर्वी काल रात्रीच सर्वच चॅनेलवर वेगवेगळे एक्झिट पोल पाहायला मिळाले. जवळपास सर्वच एक्झिट पोल मध्ये भाजपप्रणीत NDA ला बहुमत मिळताना दिसत आहे. त्याच दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi Tweet) यांनी सोशल मीडियावर एकामागून एक ट्विट करत देशवासीयांचे आभार मानले तसेच विरोधी INDIA आघाडीवरही निशाणा साधला आहे.

काय आहे मोदींचे ट्विट –

या निवडणुकीत संपूर्ण भारताने मतदान केले आहे. ज्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मतदारांचा सक्रिय सहभाह हा आपल्या लोकशाहीसाठी फार महत्त्वाचा घटक आहे. मतदारांचे समर्पण आणि वचनबद्धता यामुळे आपल्या देशातील लोकशाहीची भावना सुनिश्चित होते. देशातील महिला तसेच तरुणांचे मी विशेष कौतुक करू इच्छितो. त्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. संपूर्ण निवडणूक सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी देशातील सुरक्षा व्यवस्थेने खूप मेहनत घेतली. त्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या सुरक्षा व्यवस्था संपूर्ण निवडणुकीदरम्यान दक्ष होत्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात सुरक्षित वातावरण निर्माण झाले. ज्यामुळे लोकांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली.

INDIA आघाडीवरही निशाणा-

यावेळी मोदींनी INDIA आघाडीवरही निशाणा साधला. इंडिया आघाडी ही जातीवादी, भ्रष्ट आहे. घराणेशाहीला पोसण्यासाठी इंडिया आघाडी करणायात आली. इंडिया आघाडीला नेत्यांना आकर्षित करता आले नाही.इंडिया आघाडी भविष्यातील दृष्टीकोन सांगण्यात अपयशी ठरले. इंडिया आघाडीने संपर्ण प्रचारात मोदी यांना लक्ष केले. पण जनतेने त्यांच्या प्रतिगामी राजकारणाला नाकारले आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.