देशात पाच वर्षात 1500 कायदे रद्द केले; पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक व धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यांच्या धाडसी निर्णयमुळे ते आज लोकप्रिय आहेत. त्यांनी आज कायद्याबाबत एक विधान केले आहे. त्यांनी आपण पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या वर्षभरात तब्बल 1500 कायदे रद्द केले आहेत, असे सांगितले आहे.

नागरी सेवा दिनानिमित्त आज दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आज जनता शांततेत राहत आहे. आपण आज अमृत महोत्सव साजरा करत आहोत. ७५ वर्षाच्या कालावधीत सरदार वल्लभाई पटेल यांनी नागरी सेवा हि आमल्याला भेट दिली आहे.या सेवेच्या माध्यमातून त्यातील अधिकाऱ्यांनी देशाच्या विकासासाठी काही ना काही योगदान दिले आहे. त्यांनी अनेक माध्यमातून देशाची एक प्रकारे सेवाच केली आहे.

मोदींनी सांगितली ‘हि’ तीन उद्धिष्ठ

आज पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची तीन उद्दिष्टे सांगितली. त्यामध्ये प्रथम सामान्य माणसाच्या जीवनात बदल होणे आवश्यक आहे. दुसरे आपण आपल्या देशात ज्या काही गोष्टी करू त्याचा उल्लेख जागतिक संदर्भात करणे आवश्यक आहे. आणि तिसरे आपण कुठेही असलो तरी आपण आपल्या देशाची एकता आणि अखंडता राखण्याची गरज आहे.