राज्यात सत्तांतरांचे वेध : आता साहेब मुख्यमंत्री होतायत काळजी नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाराज साहेब, आता साहेब मुख्यमंत्री होतायत काळजी नाही आता हे वाक्य आणि व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवसेनेकडून सातारा जिह्याची खासदारकीची निवडणूक लढवणारे नरेंद्र पाटील यांचे हे वाक्य म्हणजे राज्यात सत्तांतर होवून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची भविष्यवाणी असून भाजपा समर्थकांना राज्यात पुन्हा सत्तांतरांचे वेध लागल्याचे दिसून येत आहे. फेसबुक लाईव्ह केलेला हा व्हीडीओ व संभाषण राज्यात चर्चेचा विषय झाला आहे.

राज्यसभेचे भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आणि आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची महामार्गावर गाडी थांबवून गळाभेट झाली. या भेटीत छ. भोसले व नरेंद्र पाटील अत्यंत खूश असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सध्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील लेटरबॉम्ब, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, हिरेन मृत्यू प्रकरण यामुळे महाविकास आघाडीवर विरोधकांच्याकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडीचे सरकार जावून भाजपाचे सरकार येईल अशी भविष्यवाणी नरेंद्र पाटील यांच्या गळाभेटीच्या वाक्यातून स्पष्ट होत आहे.

 

नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सातारा जिल्हा मतदारसंघ असल्याने निवडणूक लढविली आहे. परंतु त्याचे प्रेम हे भाजपा व देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे नेहमी दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटील यांच्याकडे होते. मात्र तरीही मराठा आरक्षणाचा मुद्यावरून त्यांनी महाविकास आघाडीवर लक्ष्य साधले होते. त्याचा परिणाम त्याचे महामंडळाचे अध्यक्षपद गमवावे लागले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र पाटील यांच्या घरगुती कार्यक्रमात दिसून येत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नरेंद्र पाटील यांची कराड येथे घरगुती भेटही घेतली होती. सध्या राज्यातील सरकार जावून भाजपाचा सरकार येईल, अशी आशा बहुतेक नरेंद्र पाटील यांना आहे. त्यांनी शनिवारी (दि. २०) झालेल्या छ. उदयनराजे भोसले यांची गळाभेट घेताना आनंदाच्या भरात म्हणाले, महाराज साहेब, आता साहेब मुख्यमंत्री होतायत काळजी नाही.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment