मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार उदासीन का; नरेंद्र पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा समाजाकडून सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा आरक्षणप्रश्नी उदासीन का असा सवाल माजी आमदार नरेंद्र पाटील केला आहे.

नरेंद्र पाटील म्हणाले, “शरद पवार देशाच्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जातात, असा कुठलाही प्रश्न नाही, जो त्यांना माहित नाही. सर्व प्रश्न त्यांना माहित आहे. पण मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर ते इतके उदासीन का ?

राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख मराठ्यांचा पक्ष म्हणून आहे. सर्वाधिक आमदार खासदार हे मराठा समाजाचे आहेत. मागील वेळी सर्व समाजाने एकत्रित ‌ येऊन आंदोलन केले. पण या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने सोयीस्कर पणे आंदोलनास बगल दिली आहे असा आरोप देखील नरेंद्र पाटील यांनी केला. दरम्यान, आमची ही सरकार विरोधातील आरक्षणाची लढाई सुरूच ठेवणार आहे असेही त्यांनी सांगितले.