सत्तेचा वापर हा जनतेच्या विकासासाठी झाला पाहिजे – नरेंन्द्र पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी जात आहे. सत्तेचा वापर हा जनतेच्या विकासासाठी झाला पाहिजे हेच उद्दिष्ठ ठेऊन निवडणुकीस सामोरे जात आहे असे प्रतिपादन माथाडी नेते आणि शिवसेना भाजप युतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार नरेंन्द्र पाटील यांनी केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे पाटील यांनी दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व महात्मा ज्योतिराव फुले व ज्येष्ठ नेते स्व. पी. डी. पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नरेंन्द्र पाटील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सातारला रवाना झाले. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. या महानपुरूषाचा आशिर्वाद घेऊन अर्ज दाखल करत आहे. सातारा जिल्हा गेल्या दहा वर्षांपासून विकासापासून वंचित राहिला आहे. जिल्ह्यामध्ये औद्योगिक, शैक्षणिक, बेरोजगारी, पर्यटन, रेल्वेचा प्रश्‍न, जिल्ह्यातील दुष्काळ संपवण्यासाठी धारणातील पाण्याचा प्रश्‍न हे मुद्दे घेऊन निवडणुक लढवत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे नागरिकांची सेवा करत आहेत. त्यांनी देशाला भरभरून असे काही दिले आहे असे पाटील यांनी सांगितले.

सत्तेचा वापर हा जनतेच्या विकासासाठी, समाजासाठी व गावाच्या विकासासाठी व्हावा. पण काही राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर स्वतःचा व सहकार्‍यांचा विकास करण्यासाठीच करण्याचे धोरण राबविले आहे असे म्हणत पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

स्मिता आर आर पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?

Leave a Comment