मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाविषयी काहीही माहिती नाही; माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची टीका

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

मराठा आरक्षणाविषयी पत्रकारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना प्रश्‍न विचारला असता. त्यांनी आरक्षणाविषयी काहीही न बोलता अशोक चव्हाण यांना बोलण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांना आरक्षणाविषयी काहीही माहिती नसल्याने त्यांनी पत्रकारांना उत्तरे न दिल्याची टिका माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली.

पाटण तहसीलदार कार्यालय समोर मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा तरुणांचं बेमुदत साखळी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आदोलनात 20 तरूणांचा सहभाग आहे.आज नरेंद्र पाटील यांनी या ठिय्या आंदोलनात उपोषण करत सहभाग नोंदवला.

नरेंद्र पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील युवकांनी राज्य सरकाराने मराठा समाजाकडे दुर्लक्ष केले असल्याने आरक्षणाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस साहेबांन मराठा समाजासाठी ज्या योजना तयार केलेल्या होत्या. त्या योजनाही बंद पडायला लागल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या बैठकीत छ. उदयनराजे भोसले यांनी जे मुद्दे सांगितले त्यांची योग्य उत्तरे मुख्यमंत्र्यांना सांगता आलेली नाहीत. संजय राठोड यांच्यासाठी स्पेशल पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्‍न विचारण्यात आला मात्र अशोक चव्हाणांनी सगळा दोष सुप्रीम कोर्ट आणि केंद्रसरकारला दोष दिला. परंतु स्वताः काय केले याबाबत स्पष्टीकरण केले नाही.

देवेद्र फडणवीस यांच्य काळात ते मराठा आरक्षणविषयी स्वतः पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तरे देत होते. परंतु मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्री मुद्दाम बोलत नाहीत. असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like