हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपले अवकाश खूप मोठे आहे. अवकाशात नक्की काय घडते ? कोणत्या गोष्टी असतात? या सगळ्याची माहिती जाणून घेण्यासाठी सगळेच लोक उत्सुक असतात. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अनेक शोध लावलेले आहे. परंतु अनेक गोष्टींचा त्यांना शोध लागलेला नाही.परंतु अशातच आता एक आवाक करणाऱ्या रहस्याची उकल करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले आहे. चंद्रावर असणारी माती तेथील ध्रुव आणि जीवसृष्टी या संदर्भात आता आणखी एक गोष्ट समोर आलेली आहे. आणि त्याबाबत अनेक दावे देखील केले जात आहे.
शास्त्रज्ञांना चंद्रावर एक गुहा सापडलेली आहे. या गुहेचा शोध लागल्यापासून आता वेगवेगळे अंदाज लावले जात आहे. काही वर्षांमध्ये माणूस चंद्रावर सहज राहू शकतो. अशी देखील अशा व्यक्त केली जात आहे. बीबीसीने नासाच्या अहवालातून काही फोटो शेअर केलेले आहेत. ही गुहा साधारण 100 मीटर एवढी खोल आहे. त्यामुळे मानवाला सहज तिथे राहता येऊ शकते. अशाप्रकारे शेकडो गुहा चंद्रावर असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.
गुहा कुठे आढळली ?
अपोलो ११ ज्या ठिकाणी लँड झाले होते. त्या ठिकाणाच्या अगदी जवळपास ही गुहा सापडलेली आहे. अपोलो 11 हे एक अंतराळ यान आहे 55 वर्षांपूर्वी चंद्रावर यशस्वी लँडिंग करत नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. याच ठिकाणापासून साधारण काही अंतरावर ही गुहा सापडलेली आहे.
चंद्रावर सापडलेल्या या गुहेची तुलना संशोधकांनी पृथ्वीवर ज्वालामुखीच्या उद्रेकातून ज्या नैसर्गिकरित्या भुयारे तयार झालेली आहेत. त्याच्याशी तुलना केलेली आहे. एकीकडे या गुहेसंदर्भात चर्चा चालू आहे, तर दुसरीकडे अशी देखील माहिती समोर येत आहे की, अंतराळावीरांना चंद्रावरून काही विचित्र शीळ वाजल्यासारखे आवाज आलेले आहे. ओपोलो 10 मोहिमेदरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगितले गेलेले आहे. तर नेमका हा आवाज कशाचा आहे? त्या ठिकाणी एलियन्सचा वावर तर नाही ना? अशा वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज देखील व्यक्त केले जात आहेत.