….जेव्हा सूर्यही Smile देतो; NASA ने शेअर केला खास फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा कधी आपण आकाशात बघतो तेव्हा ढगांमध्ये आपल्या काही काल्पनिक चित्रे दिसतात. पण सूर्याला कधी हसताना तुम्ही बघितलं आहे का? नसेल बघितलं तर लगेच पाहून घ्या… सूर्याला सुद्धा हसताना बघताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अमेरिकन अंतराळ संस्था नासानेच अशाप्रकारचा एक फोटो शेअर केला आहे.

नासाच्या एका उपग्रहाने नुकताच सूर्याचा ‘हसणारा’ फोटो क्लिक केला आहे. हा फोटो शेअर करत नासाने लिहिले की, ‘आज नासाच्या सोलर डायनामिक्स ऑब्झर्व्हेटरीने ‘हसणारा’ सूर्य पाहिला. अतिनील प्रकाशात दिसणार्‍या सूर्यावरील या गडद डागांना ‘कोरोनल होल’ असे म्हणतात. हे असे क्षेत्र आहेत जिथे खूप जोरदार सौर वारा असतो.

सूर्याचा हा फोटो संपूर्ण जगात वाऱ्यासारखा पसरला. हा फोटो पाहून नेटकरीच नव्हे तर शास्त्रज्ञ सुद्धा अवाक झाले . इंटरनेटवरील काही यूजर्सनी तर या सूर्याच्या फोटोची तुलना कार्टून शोमध्ये दिसलेल्या सूर्याशी केली. दरम्यान, सोलर डायनॅमिक्स ऑब्जर्वेटरी हे नासाचे एक मिशन आहे. या मिशन अंतर्गत सूर्याबाबतच्या रहस्यांवर संशोधन सुरु आहे. नासाकडून हे मिशन 11 फेब्रुवारी 2010 रोजी लाँच करण्यात आलं आहे.