नसीरुद्दीन शाह यांना झाला निमोनिया, मुंबईतील रुग्णालयात केले दाखल

नवी दिल्ली । बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना निमोनिया झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना मुंबईतील खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. त्यांची पत्नी रत्न पाठक शहा आणि मुले रूग्णालयात त्यांच्याबरोबर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते आता उपचारातून बरे होत आहे आणि त्यांची तब्येतही सुधारत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते, अशी माहिती त्यांच्या मॅनेजरने दिली आहे पण आता ते उपचार घेत आहेत.

नुकतेच मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांच्या निधनाच्या बातमीमुळे बॉलिवूड शॉकमध्ये आहे. या बातमीनंतर नसीरुद्दीन शाह यांच्या मृत्यूची बातमीही सोशल मीडियावरही व्हायरल होऊ लागली. मात्र ते अजूनही ठीक आहेत आणि रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group