नाशिक दुर्घटना निष्काळजीपणामुळे, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल : नाशिक पोलीस आयुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथील झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन 22 हून अधिक जणांचे प्राण गेले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. मुख्यमंत्री कार्यालयाने देखील या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये मदतीची घोषणा देखील केली आहे. आता याबाबत आणखी माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या अहवालानुसार निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

याबाबत पोलिसांनी नाशिक पोलीस आयुक्त यांनी माहिती दिली आहे त्यांनी म्हटले आहे की, ‘ नाशिक ऑक्सिजन टँकर गळती ची दुर्घटना निष्काळजीपणामुळे घडली आहे. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता कलम कलम 304अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती २२ हुन अधिक जणांचा मृत्यू

नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन टॅंकमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली. यामुळे सर्वत्र ऑक्सिजन पसरल्याने एकच गोंधळ उडाला आहे. याशिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णां पैकी 171 ऑक्सिजनवर आहेत तर व्हेंटिलेटर आणि अत्यवस्थ रुग्णांची संख्या 67असल्याची माहिती मिळत आहे . माहितीनुसार आतापर्यंत २२ हुन अधिक रुग्ण दगावले असल्याची माहिती मिळाली आहे.

टॅंक लीक झाल्यानंतर तब्बल अर्धा तास ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाला होता. या दरम्यान काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लीक झालेला ऑक्सिजन टॅंक हा 20 KL क्षमतेचा होता. या घटनेनंतर मात्र रुग्णालय परिसरात एकच धावपळ सुरू झाली. या घटनेचा शोक व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा अशी घटना घडू नये याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

Leave a Comment