आश्चर्य !चक्क डान्स करत चोरांनी केली ३ लाखांची चोरी ; चोरांचा डान्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख , 

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरांचा धुमाकूळ. आज येवल्यात चोरट्यानी रात्री पैठणीच्या कारखान्यातुन 3 लाख रुपयांच्या पैठणी नेल्या चोरून, विशेष म्हणजे चोरी करतांना चोरट्यांनी डान्स ही केला.

सध्या नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरांनी धुमाकूळ घातला असून चांदवड व मालेगावात घडलेल्या चोरीच्या घटना ताज्या असतांना रात्री 3 जणांच्या टोळीने येवल्यात नाकोडा या पैठणी तयार करणाऱ्या कारखान्याचे मागचे दार तोडून आत प्रवेश केला आणि 3 लाख रुपये किमतीच्या महागड्या पैठणी साड्या लंपास करून पसार झाले.चोर इतके बिनधास्त होते की त्यांनी डान्स करत करत चोरी केली मात्र त्यांची चोरी व डान्स हे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

या प्रकरणी येवला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच चोरट्यांना जेरबंद केले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे

Leave a Comment