VIDEO: रमजान का मतलब ही सब्र है, सांगत विश्वास नागरे पाटलांनी दिल्या रमजानच्या शुभेच्छा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । रमजानचा पवित्र महिना २४ एप्रिलला चंद्र दर्शनासह सुरू झाला आहे. चंद्र दर्शनानंतर लोकांनी एकमेकांना रमजानसाठी शुभेच्छा दिल्या. रमजान महिना येताच लोक खुश असतात, पण यंदा मात्र करोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे सर्व सण-उत्सवबरोबरच रमजानच्या पवित्र महिन्यावर विरजण आलं आहे. अशावेळी नाशिक शहरामध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करत नाशिक पोलिस आयुक्तालयानं एक खास व्हिडीओ संदेश प्रसारित केला आहे. या व्हिडिओत नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी मुस्लिम बांधवाना पोलीस दलाच्या वतीनं रमजानच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, या शुभेच्छा देताना त्यांनी सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून देत ‘रमजान का मतलब ही सब्र है’ म्हणत नाशिकरांना यंदाचा रमजान घरीच साजरी करण्याचा संदेश दिला आहे. चला तर पाहुयात..या व्हिडीओमध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील नेमकं काय म्हणालेत ते..

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment