हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल धकाधकीच्या आयुष्यात माणूस मानसिक शांतता विसरत चाललेला आहे. आणि तीच मानसिक शांतता मिळवण्यासाठी अनेक लोक मेडिटेशन करत आहेत. आपल्या महाराष्ट्रात अनेक मेडिटेशन केंद्र देखील उभारण्यात आलेली आहेत. ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही मेडिटेशन करू शकता आणि मानसिक शांतता मिळवू शकतात. परंतु तुम्हाला माहित नसेल की, जगातील सगळ्यात मोठे मेडिटेशन सेंटर हे आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि अगदी परदेशातून देखील अनेक लोक ध्यानधारणा करण्यासाठी महाराष्ट्रातील या मेडिटेशन सेंटरवर येत असतात. हे सेंटर नाशिकमध्ये आहे. नाशिक मधील विपश्यना केंद्र हे जगातील सर्वात मोठे मेडिटेशन केंद्र म्हणून ओळखले जाते. धम्मगिरी नावाने हे विपश्यना केंद्र ओळखले जाते. जगभरातून हजारो लोक या ठिकाणी ध्यानधारणा करायला येत असतात.
महाराष्ट्रातील नाशिक जवळील धम्मगिरी नावाने हे विपश्यना केंद्र प्रसिद्ध आहे. नाशिकपासून केवळ 45 किलोमीटर अंतरावर हे केंद्र आहे. तसेच मुंबईपासून 136 किलोमीटर अंतरावर हे केंद्र वसलेले आहे. या केंद्रामध्ये अनेक शिबिर असतात. तुम्हाला जर दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरामध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला विपश्यना केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि तिथे नोंदणी करावी लागेल.
दहा दिवसांच्या या शिबिरामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या जातात. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला मानसिक शांतता मिळते. आणि तुमची एकाग्रता देखील वाढते. केवळ दहा दिवसातच तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. या दहा दिवसाच्या शिबिरामध्ये तुम्हाला मेडिटेशनचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो. आयुष्यात कुठल्या गोष्टी कराव्यात. कोणत्या ठिकाणी कोणता निर्णय घ्यावा. मनाला शांत ठेवून कशा प्रकारे गोष्टी कराव्यात. या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. संपूर्ण जगामध्ये अनेक विपश्यना ध्यान केंद्र आहेत. परंतु त्यातील धम्मगिरी हे जगातील सर्वात मोठे विपश्यना ध्यान केंद्रांपैकी एक आहे. त्यामुळे अनेक लोक नाशिकला भेट देत असतात. आणि त्यांच्या शिबिरामध्ये सहभागी होत असतात.