नाशिक मध्ये रंगली सर्व पक्षीय मिसळ पार्टी

0
37
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख

निवडणुका म्हटलं की आरोप-प्रत्यारोप आलेच. मात्र, राजकारणात सर्व काही शक्‍य आहे असे म्हणत नाशिकमध्ये सर्वपक्षीय मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणुकीच्या प्रचाराचा राग विसरून सर्वच उमेदवार आणि पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत मिसळीचा आनंद घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी या मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. प्रत्येक पक्षाच्या विचारधारेवर कार्यकर्ते आणि नेते निवडणुकीच्या कालावधीमध्ये काम करत असतात. त्यामुळे वैचारिक मतभेदामुळे अनेकवेळा एकमेकांमध्ये कटुता येते. ही कटुता जावी म्हणून या मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे रंजन ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी समीर भुजबळ म्हणाले, की निवडणुकीच्या कामकाजानंतर सर्वपक्षीय नेते मंडळींनी नाशिकच्या विकासासाठी व जनतेसाठी एकत्र यावे या हेतूने या पार्टीचे आयोजन केले होते. तर, ही कटुता राजकीय असते. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर हे सर्व विसरून समाजामध्ये चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here