कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील अर्बन व ऑलिंपिक स्पोर्ट्स क्लबची खेळाडू स्नेहा सूर्यकांत जाधवने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय चॅम्पियनशीप स्पर्धेत हॅमरो थ्रो क्रीडा प्रकारात रजत पदक (सिल्व्हर) मिळवले.
स्नेहा जाधव माणदेशी चॅम्पियनही आहे. सध्या दिल्लीमध्ये स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेत भारतातून 18 खेळाडू सहभागी झाले होते. पहिल्या दोन प्रयत्नात अयशस्वी झाल्यानंतर पुन्हा स्नेहाने जोमाने प्रयत्न करून यश संपादन केले. 2016 साली जागतिक शालेय मैदानी स्पर्धा तसेच तुर्की येथे झालेल्या 2017 ज्युनिअर आशियाई मैदानी स्पर्धा बँकॉक सहभाग घेतला होता.
त्याबद्दल अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, चेतना सिन्हा, प्रभात सिन्हा, शिवाजी शिक्षण संस्था सचिव प्रकाश पाटील, प्राचार्य राजमाने, जिल्हा संघटनेचे पांडुरंग शिंदे, उत्तमराव माने, अशोकराव थोरात, संजय वाटेगावकर, राम कदम यांनी अभिनंदन केले.