National Credit Framework | विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!! शाळांमध्ये क्रेडिट सिस्टीम लागू होणार

National Credit Framework
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सध्या शिक्षण पद्धतीमध्ये नवनवीन बदल होत आहेत. आजकालच्या वातावरणाचा, त्याप्रमाणे मुलांच्या सर्वांगीण विकासाचा आणि त्यांच्या गरजेचा विचार करून नवनवीन बदल होताना दिसत आहेत. शाळेमध्ये नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क (National Credit Framework) या अंतर्गत देखील विविध प्रयोग राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महत्त्वाची पावले देखील उचलली जात आहे. या धोरणानुसार आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांमध्ये आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी शाळांच्या नियमांमध्ये एक बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा बदल येत्या शैक्षणिक वर्ष 2024 -25 पासून लागू करण्यात येणार आहे. शाळेमध्ये आता क्रेडिट सिस्टम प्रणाली (National Credit Framework) लागू होणार आहे. हा प्रोजेक्ट शाळेमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवला जाणार आहे.

क्रेडिट सिस्टीम काय आहे ? | National Credit Framework

ही क्रेडिट सिस्टीम सहावी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या प्रणालीमध्ये नवनवीन वर्षांत 210 तास प्रत्येक विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यास 40 ते 50 क्रेडिट गुण दिले जाणार आहे. परंतु यासाठी दोन अटी देखील ठेवलेल्या आहेत. पहिली अट म्हणजे सर्व विषयात परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आणि दुसरी अट म्हणजे वर्षभरात वर्गात 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याने जर 5 विषय घेतले असते, तर 210 प्रति विषयाप्रमाणे 1050 तास अभ्यासाचे होतात. तसेच यामध्ये 150 तास अंतर्गत मूल्यांकन, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव आणि सामान्य अभ्यासासाठी असणार आहे. प्रत्येक विषयासाठी सात क्रेडिट असणार. म्हणजेच सक्तीचे असणारे पाच विषय घेतले, तर त्याला 40 क्रेडिट मिळेल जर एखाद्या विद्यार्थ्याने सहा किंवा सात विषय घेतले, तर त्याला 47 ते 54 पर्यंत क्रेडिट मिळणार आहे.

नववी प्रमाणे अकरावीमध्ये विद्यार्थ्यांना क्रेडिट

अकरावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील हे क्रेडिट मिळणार आहे. अकरावीमध्ये एक भाषा आणि चार विषय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास 40 क्रेडिट दिले जाणार आहे. अकरावीमध्ये अंतर्गत मूल्यमापन, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव आणि सामान्य अभ्यासासाठी दीड तास असणार आहे. विद्यार्थ्यांनी हे विषय घेतल्यास त्यांना 47 ते 54 एवढे क्रेडिट मिळणार आहे.

हे क्रेडिट अकॅडमी बँकेत जमा होणार

विद्यार्थ्यांना मिळणारे क्रेडिट हे अकॅडमी बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होणार आहे. सीबीएससी बोर्डाने प्रत्येक शाळेला या प्रणालीत सहभागी होण्याचे आव्हान केलेले आहे. त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणाऱ्या शाळांना बोर्डकडून मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.