हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणजे आताच्या तरुणाईतील एक सुप्रसिद्ध चेहरा. अनेको तरुण तिच्या प्रेमात पागल आहेत. तिची चाल, तिची अदा आणि घायाळ करणारे हास्य.. बस ईतनाही काफी है.. यासाठी गूगलने तिला चक्क नॅशनल क्रश असा टॅगदेखील दिला आहे. यामुळे तिच्या प्रत्येक अपडेटसाठी तिचे चाहते उत्सुक असतात. आता काय म्हणे तर रश्मिकाला तमिळनाडूची सूनबाई बनायचे आहे. तिचे लग्न झाल्यावर तमिळनाडूमध्ये कायमचे स्थायिक होण्याचा तिचा विचार आहे.
https://www.instagram.com/p/CNxceKepwKX/?utm_source=ig_web_copy_link
रश्मिका तमिळनाडूतील प्रथा, परंपरा, संस्कृती आणि विशेषतः तेथील खाद्यपदार्थांच्या जणू प्रेमातच पडली आहे. हे असे तमिळी खाद्यपदार्थ नेहमीच खायला मिळावेत, यासाठी आपले लग्न एखाद्या तमिळी तरुणासोबतच व्हायला हवे, अशी तिची अपेक्षा आहे. रश्मिका मंदानाचा जन्म कर्नाटक येथे झाला आहे. तिने कन्नड, तमिळ आणि तेलगू अश्या तिन्ही भाषिक चित्रपटांत काम केले आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा लीड रोल असलेल्या ‘मिशन मजनू’ या आगामी चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये अर्थात हिंदी भाषिक चित्रपटांत पदार्पण करणार आहे.
https://www.instagram.com/p/CMB0XihA6xk/?utm_source=ig_web_copy_link
याशिवाय ती बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘गुडबाय’मध्ये दिसणार आहे. तर अमिताभ बच्चन यांच्याच सोबत तिला आणखी एका सिनेमात रोल मिळाला आहे. पण अद्याप या चित्रपटाचे काही शीर्षक ठरलेले नाही.
https://www.instagram.com/p/CNSlU_7JyoO/?utm_source=ig_web_copy_link
आता रश्मिका जर म्हणतेय कि तिला तामिळ मुलासोबत लग्न करायचे आहे. कायमचे तामिळनाडूमध्ये स्थायिक होऊन तामिळनाडूचे सुनबाई म्हणून मिरवायचे आहे तर ह्यासाठी तिचे कष्ट तिलाच करावे लागणार आहेत. तिला तमिळनाडूची सुनबाई व्हायचे असेल तर त्यादृष्टीने तिला हालचाली करायला लागणार आहेत. जर का तिचा एखादा तामिळ बॉयफ्रेंड असेल तर काय कामच झालं..
https://www.instagram.com/p/CEKDD8ip8sy/?utm_source=ig_web_copy_link
पण नसेल तर ..? तिला घाई करावी लागेल. कारण जर का एकदा तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि हिंदीमध्ये प्रस्थापित झाली तर कदाचित तिचे तमिळनाडूबाबतचे क्रेझ कमी होईल. मग यापुढे कदाचित ती मुंबईत कायमची स्थायिक होऊन मुंबईची सुनबाई होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही.