National Doctor’s Day 2024 | आपण नेहमीच असे ऐकले आहे की, आपले आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असते. जर आपले आरोग्य चांगले असेल, तर आपण कुठल्याही गोष्टी करू शकतो. एका व्यक्तीसाठी निरोगी आरोग्य खूप महत्त्वाचे असते. आपल्याला हे निरोगी आरोग्य देण्यासाठी डॉक्टरांची भूमिका खूप महत्त्वाची असते. अगदी लहान मोठ्या आजारांपासून ते सगळे आजार डॉक्टरांच्या मदतीने बरे होतात. म्हणूनच अनेकवेळा लोक डॉक्टरांना देवाचा दर्जा देतात. अशातच आज 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे (National Doctor’s Day 2024) साजरा केला जातो. प्रसिद्ध डॉक्टर आणि बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉक्टर विधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ हा राष्ट्रीय डॉक्टर दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो.
1 जुलैला डॉक्टर डे का साजरा केला जातो ? | National Doctor’s Day 2024
वेगवेगळ्या देशांमध्ये डॉक्टर्स डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. परंतु भारतात हा दिवस 1 जुलै रोजी साजरा केला जातो. कारण या दिवशी भारतातील प्रसिद्ध चिकित्सक डॉक्टर बिधानचंद्र राय यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू देखील 1 जुलै 1962 रोजी झाला. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी 1 जुलै रोजी संपूर्ण देशात राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो.
डॉक्टरचे साजरा करण्यामागील उद्देश
डॉक्टरांचे आपल्या आरोग्यासाठी खूप मोठे योगदान आहे. अगदी कोणत्याही परिस्थितीत ते त्यांच्या पेशंटला जास्त महत्त्व देतात आणि त्यांना बरे करतात हेच डॉक्टरांचे योगदान आणि त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकांना जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सगळ्या गोष्टींचा त्याग करून रुग्णांसाठी डॉक्टर हजर असतात. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा डॉक्टर दिन साजरा करण्यामागील मोठा उद्देश आहे. कोविडच्या काळात जेव्हा संपूर्ण जग हे या आजाराने घाबरून घरात बसले होते. त्याचवेळी डॉक्टरांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता ड्युटी केलेली आहे. यामध्ये अनेक डॉक्टरांना जीव देखील गमवावा लागलेला आहे.
डॉक्टर्स डे 2024 ची थीम
दरवर्षी डॉक्टर्स डे हा कोणत्या ना कोणत्या थीम सह साजरा केला जातो. 2024 मधील राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम ही फिलिंग हँड्स आणि केअरिंग हार्टस अशी आहे.