गोव्याचे नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पणजी प्रतिनिधी | गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती.

प्रमोद सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई या दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पर्रिकरांवर अंत्यसंस्कार होण्याचीही वाट न पाहता, राजकीय गणित जुळवण्यास काँग्रेस आणि भाजपने सुरुवात केली होती. अखेर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निकटवर्तीय असलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. डॉ. प्रमोद सावंत हे गोव्यातील सांखळी मतदार संघाचे भाजपचे आमदार आहेत. सध्या ते गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत.

 

इतर महत्वाचे –

उद्धव ठाकरेंवर केलेली टीका चांगलीच भोवली… उमेदवारी अडचणीत

नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण

म्हणून मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर ?

Leave a Comment