भारतीय वायुदलाचे मिग २१ विमान ‘येथे’ कोसळले

1
60
Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर प्रतिनिधी | भारतीय वायूदलाचं  मिग २१ हे विमान राजस्थानमध्ये कोसळलं आहे. बिकानेरमधील शोभासर गावाजवळ मिग २१ हे लढाऊ विमान कोसळलं. नाल हवाईतळाजवळ शोभासर हे गाव आहे.नाल हवाईतळ हे पश्चिम राजस्थानातील महत्त्वाचं हवाईतळ आहे.

विमान कोसळल्यानंतर पायलट सुरक्षितरित्या बाहेर आल्याने जीवितहानी टळली आहे. पायलटने वेळीच प्रसंगावधान लक्षात घेऊन पॅराशुटद्वारे विमानतुन आपली सुटका करून घेतली. बिकानेर जिल्हाधिकाऱ्यांनी विमान दुर्घटेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिग २१ कोसळल्यानंतर गावकऱ्यांनीही धुराचे लोट पाहिल्याचं सांगितले आहे. तसेच दोन पायलट पॅराशूटद्वारे बाहेर आल्याचंही गावकऱ्यांनी पाहिलं असल्याचं बोललं जात आहे.

मिग २१ हे भारताचं लढाऊ विमान आहे. या विमानाला सातत्याने अपघात होत असतात. त्यामुळे मिग २१ विमाने वायूदलातून हद्दपार करण्याची मागणी झाली होती.

 

इतर महत्वाचे –

सांगलीत बिबट्याच्या बछड्याचे दर्शन ; नागरिकांत भीतीचे वातावरण

लोकसभा निवडणूकीसाठी सांगली पोलीस दल सज्ज : गुंडांविरोधात ऍक्शन प्लॅन तयार

प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा होणारा गौरव हा नारीशक्तिचा सन्मान – श्रीनिवास पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here