नक्षलवादी म्हणून पोलिसांनी घातल्या १७ ग्रामस्थांना गोळ्या, न्यायालयाच्या अहवालातून मिळाली माहिती

नक्षलवादी म्हणून पोलिसांनी घातल्या १७ ग्रामस्थांना गोळ्या, न्यायालयाच्या अहवालातून मिळाली माहिती छत्तीसगड पोलिसांनी २०१२ मध्ये बिजापूर जिल्ह्यातील सरकेगुडा येथे केलेल्या बनावट चकमकीत १७ ग्रामस्थांना गोळ्या घालून ठार केले होते, अशी धक्कादायक माहिती न्यायालयीन चौकशीतून उघड झाली आहे. या प्रकरणी सात वर्षे सुनावणी झाली आणि त्यानंतर न्यायमूर्ती विजय कुमार अग्रवाल यांनी याबाबतचा चौकशी अहवाल मागील महिन्यात सादर केला. मात्र, रविवारी हा अहवाल लीक झाला. त्यातून ही माहिती उघड झाली आहे.

भारतीय खगोलशास्त्रज्ञानेच ‘विक्रम लँडर’चा पत्ता शोधला

अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं चांद्रयान-२ मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली आहे. विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याचा दावा नासाकडून करण्यात आला आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा फोटो टिपला आहे. विशेष म्हणजे नासाने हा दावा केला असून तो एका भारतीय इंजिनिरने दिलेल्या माहितीतूनच समोर आलं आहे. चेन्नई येथील ट्विटवर शान नाव असलेल्या षण्मुगा सुब्रमण्यम या युवा इंजिनिअरनेच विक्रम लँडरशी सर्वात प्रथम संपर्क साधला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे भाडे सरकारने थकवले !

देश विदेशामध्ये प्रवास करण्यासाठी नेत्यांना ‘एअर इंडिया’ तर्फे सेवा पुरवली जाते. मात्र कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र आता सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलेला नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

सरकारने नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे ४५८ कोटी रुपये थकवले !

सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलच नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

राज्यात फिल्मसिटीसाठी मुख्यमंत्र्यांचे बच्चनला साकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची अमिताभ बच्चन यांसोबत काल रविवारी भेट झाली. साधारण पाऊण तास झालेल्या भेटीत, आमचं सरकार राज्यात फिल्म सिटी उभी करण्याविषयीच्या सर्व प्रस्तावांवर विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं. अमिताभ बच्चन आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटासाठी आलीय भट्ट, रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या सोबत सध्या मनालीमध्ये आहेत. … Read more

बलात्काऱ्यांना जनतेसमोर ठेचून मारले पाहिजे! जया बच्चन राज्यसभेत हैदराबाद घटनेवर संतापल्या

चार दिवसांपूर्वी झालेल्या हैदराबाद मधील पशुवैद्यक असलेल्या तरुणीच्या बलात्काराच्या घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली. सर्व माध्यमातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. देशातील अनेक मान्यवर , सेलेब्रिटी यांनी देखील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या खिशाला कात्री !

रिलायन्स जिओ ने दूरसंचार क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर मोठी क्रांती घडवली. याचा फटका इतर कंपन्यादेखील बसला. स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी इतर कंपन्यांनी देखील आपला मोबाइल प्लॅन कमी पैश्यांमध्ये देण्यास सुरुवात केली. मात्र यामध्ये काही कंपन्यांना मोठा तोटा झाल्याचे देखील पाहण्यात आले. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या आता भाव वाढ करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळ वाढणार!

मुंबई प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने देशातील क्रिकेटच्या प्रशासनासाठी मंडळाला सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीने लागू केलेल्या शिफारशी बाजूला सारण्यास सुरूवात केली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी पदाधिकाºयांच्या कार्यकाळाबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे ही बाब स्पष्ट झाली, त्यासोबत बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष, माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. … Read more

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात पार

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा आज दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी ‘एनडीए’चे कमाडंट एयर मार्शल आय.पी.विपिन, डेप्युटी कमाडंट रिअर अडमिरल एस के ग्रेवाल उपस्तिथ होते. २८४ केडेट्स यावर्षी येथून उत्तीर्ण होऊन देशसेवेसाठी वायुदल, नौदल व भूदल यांमध्ये सहभागी … Read more

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बाळासाहेबांचा शिवसैनिक विराजमान, उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

शिवाजी पार्कवरील न भूतो न भविष्यती अशा गर्दीला संबोधत, छत्रपती शिवाजी महाराज आणि आई वडिलांना स्मरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ४३ मिनिटांनी शपथ घेतली.