लेखनऊ / काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणूक अमेठी आणि वायनरी या दोन ठिकाणांवरून लढणार आहेत. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातल्या अमेठी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. राहुल गांधी यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी अमेठीत रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
अमेठीतील शक्तीप्रदर्शना दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा हे दोघे राहुल गांधींसोबत उपस्थित होते. अमेठीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून स्मृती इराणी लढणार आहेत. ६ मे रोजी अमेठीत लोकसभा निवडणूक होणार आहे. राहुल गांधी अमेठीत गेली १५ वर्ष खासदार आहेत.
अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आणि गांधी घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ असल्याने याठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या आधी काँग्रेस कडून सोनिया गांधी या मतदारसंघातुन निवडणूक लढत असत.
इतर महत्वाचे –
मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केला नक्षलवाद्यांनी हल्ला …
‘हे’ उद्योजक माढ्यातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढणार …
Big Breaking | गिरिश महजनांना भाजप जिल्हाध्यक्षाकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल