वृत्तसंस्था आझरीबाग(झारखंड) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ फेब्रुवारी ला झारखंड येथील दुमका, पलामू आणि हजारीबाग याठिकाणी नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उदघाटन करण्यात आले.यावेळी बोलताना मोदी म्हणाले कि, “एनडीए सरकारने गेली साडेतीन वर्षे झारखंडच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत, आजही अशाच एक विकास कामसाठी येथे भेट देण्याचा प्रसंग आला”.
झारखंड राज्यात आत्तापरेंत फक्त तीन वैद्यकीय महाविद्यालये होती आता आणखी तीन वैद्यकीय महाविद्यालयांची भर पडणार आहे, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूर जावे लागणार नाही आणि लोकांना वैद्यकीय सेवा लवकर मिळण्यास मदत होऊ शकते.
दूध योजनेबद्दल बोलताना ते म्हणाले कि, या योजनेमुळे सरकारी शाळांमधील मुलांचे पौष्टिक मानांकन सुधारण्यास मदत होईल. स्मार्ट फोनसाठी शेतकऱ्यांना मिळालेल्या आर्थिक साहाय्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. आता शेतकरी हवामानाविषयी माहिती, आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान शिकू शकतात.तसेच सरकारी योजनांची माहिती घेण्यास त्यांना आता मदत होईल.
झारखंडमध्ये आयुष्मान-भारत या योजनेचा येथील लोकांना खुप फायदा झाला आहे. झारखंडमधील सर्व घरांना स्वच्छ पेयजल पुरवण्यासाठी पुढाकार घेणार आहे.यासाठी ३५० प्रकल्प सुरु केले आहेत. आरोग्याचा थेट संबंध स्वच्छता आणि साफसफाई याच्याशी असल्याने यासाठी अनेक प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
#GullyBoy | वंचित समाजातील स्वप्नाळू तरुणांची वास्तव कथा
आम्हाला चार जागा देणारे तुम्ही कोण? प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल