१२ जानेवारी – राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने – परिवर्तनाचे वाटसरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मनकवडी तरुणाई | अप्सरा आगा

स्वामी विवेकानंदाच्या स्मरणार्थ भारत सरकारने 1985 पासून त्यांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.स्वतंत्र होने का साहस करो,जहातक तुम्हारे विचार जाते है वहातक जाने का साहस करो और उन्हे अपने जीवन मे उतारने का साहस करो असा मोलाचा संदेश देणारे विवेकानंद यांचा जन्मदिवशी साजरा करण्यात येणाऱ्या युवक दिनानिमित्त हमखास डोळ्यासमोर उभं राहतं ते जागतीक सर्वधर्म परिषदेतील भाषण. विवेकानंदाच्या या भाषणाने भारताला एक वेगळीच ओळख दिली. विवेकानंद म्हणाले,जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्विकार करावा.जगाच्या पाठीवरील सर्व देशातील आणि धर्मातील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या देशाचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. परंतु त्यांचे सत्य विचार कितपत तरुणांन पर्यत पोहचले आहेत. हे तितकेच बघणे गरजेचे आहे.

व्हॅलेंटाईन डे, फ्रेडशिप डे, रोझ डे या सारख्या डे ला जसा परिसाद देताना युवक दिसतात तसेच ज्या देशाला युवकांचा देश समजला जातो त्या देशातील तरुण युवक दिनास प्रतिसाद देताना मात्र दिसत नाही. त्यामुळे तरुणांन पर्यंत खरे विवेकानंद पोहचलेच नाहीत. आज सर्व देश भारताकडे मोठ्या आशेने बघतो आहे.कारण भारत एक संधीचा देश आहे. आज आपला देश तरुण देश आहे.जिथे तरुणाई असते ना तिथे विचार असतो, एक कृती असते.

तरुणांच्या नव्या संकल्पनेने देशाच्या प्रगतीसाठी मोठा हातभार लागतो. डॉ.ए.पी.जे अब्दुल म्हणाले होतेच 2020 साली तरुणांचा भारत देश महासत्ता होणार आहे.युवा हा शब्द ऐकताच माझ्या मनामध्ये पंधरा वर्षापासून ते चाळीस -पंचेचाळीस वर्षापर्यंत नेतृत्व करणारे अनेक व्यक्ती डोळ्यासमोर येऊन फिरतात पण आज कालच्या युवा या शब्दा पाठीमागे मला दिसते ते म्हणजे भरकटलेला आणि समाजात अस्थिर असलेला मोठ्या प्रमाणातला वर्ग,यामध्ये जाणिव व सद्‌सद्‌ विवेक बुद्धीची कमतरता. राग,लोभ,मत्सर.आनंद,आणि खेद आशा अनेक भावना विस्कळीत प्रमाणात दिसून येतात. युवा एक शब्द नसून ती एक शक्ती आहे.ती शक्ती आज कालचे लोक आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी युवा पिढीचे दिशाभूल करुन स्वार्थ साधु इच्छित आहेत.तरी ही आजची जागृत युवापिढी ही नेहमी सत्य आणि सत्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे.

देशाने आज डिजिटल युगात पदार्पन केले आहे.फेसबुक,ट्विटर ,इन्स्टाग्राम आशा वेगवेगळ्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळाले खरे .पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तसेच सोशल मिडीयाकडे त्याच दृष्टीने बघण्याची गरज आहे.डिजिटल युगात समाजांच्या नैसर्गिक प्रक्रियेवर वाईट परिणाम होणार असेल तर याचा विचार नक्कीच केला पाहिजे.देशात भेडसावणाऱ्या बेरोजगारी,आजची शिक्षणप्रणाली,अभिव्यक्त होणाऱ्या स्वातंत्र्याची गळचेपी आशा अनेक समस्या विरुद्ध उठणारे आवाज दाबण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर पुरेपुर करताना दिसत आहे.

सध्या मोबाईलवर रोज मोठ्या प्रमाणात डेटा फुकट मिळतोय त्यामुळे आपण बेरोजगार असलेल्या तरुणांना विसर पडतोय. त्यामुळे व्यसनधिनता, नैराश्‍य याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. 2011-12 च्या सर्वेनुसार बेरोजगारीचा दर 1.3 टक्के होता त्यावर सरकारने काही ठोस उपाय न केल्याने 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर जवळपास 5 टक्‍क्‍यावर गेलेला दिसतो. भारतातील सर्व युवकांनी याचा विचार गंभीरपणे करायला हवा. असा भारत देश युवकांना हवा आहे का ?

आजची समाजरचना व व्यवस्था युवकांनी समाधानानं जगावं असे नाही.ते बदलावच लागेल.सामाजिक प्रश्‍नाबाबत युवकावर फार मोठा भार आहे. पण, आज आधुनिक युवक आत्मकेंद्रित न होता बंद खोलीच्या दुनियेतून बाहेर येऊन परिवर्तन करणे गरजेचे आहे.सामान्य तरुण आजही कुठल्या ना कुठल्या गुलामगिरी मध्ये जगताना दिसत आहे.हा गुलामगिरीविरुद्धचा लढा आपल्या पिढीने लढावयाचा आहे.भारतात सर्वधर्मसमभाव ,समान हक्क ,कष्टाला योग्य मोल असा समाजवादी भारत निर्माण करण्याचे आव्हान आजच्या युवकांनी स्वीकारायला हवे व भारत हा मुठभर लोकांचा महासत्ता न होता सामान्य जनतेचा व्हावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.अशी आव्हाने तरुणपिढी स्विकारेल एवढीच आशा.

अप्सरा ही पत्रकारितेची विद्यार्थीनी असून सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण करण्याची तिला आवड आहे. तिचा संपर्क – 8805407464

Leave a Comment