Saturday, March 25, 2023

जुलै महिन्यात ‘या’ दिवशी बँक बंद राहणार

- Advertisement -

नवी दिल्ली । बुधवारपासून जुलै महिन्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे येत्या महिन्यात किती दिवस बँका बंद असणार याची माहिती नागरिकांना असणं अत्यंत गरजेचं आहे. जुलै महिन्यात बँका कोण-कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत हे समजल्यास नागरिक बँकेशी निगडीत असलेलं काम तात्काळ पूर्ण करून घेतील. परिणामी खातेधारकांना त्यांच्या कामात होणारा उशिर टाळता येईल. जुलै महिन्यात तब्बल ७ दिवस बँक बंद राहणार आहे.

जुलैत ‘या’ दिवशी बँक बंद राहणार
सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांमध्ये काही सुट्ट्या अनिवार्य असतात. महिन्यात येणारे प्रत्येक रविवार आणि दुसऱ्या शनिवारी बँका बंद असतात. त्यानुसार जुलै महिन्यात ५, ११, १२, १९,२५ आणि २६ जुलै रोजी बँका बंद राहणार आहेत. याव्यतिरिक्त ३० किंवा ३१ तारखेला बकरी ईद असल्यामुळे बँकांचं कामकाज बंद राहणार आहे. दरम्यान, सरकारी कॅलेंडरनुसार ऑगस्टमध्ये बँकेच्या सुट्ट्या असतात. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आणि कृष्णा जन्माष्टमी उत्सव असल्यामुळे बँक बंद राहणार आहेत.

- Advertisement -

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”