पुसेसावळी | मतदार संघातील गावांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असुन पुसेसावळी भागातही अनेक विकासकामे केलेली आहेत. आता आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व मार्केट कमिटीच्या निवडणुका येत आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वानी काळजी घेणं आवश्यक आहे. गावाचं विकासाचं केंद्र आहे ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आपल्याला हे काम करायच आहे. त्यासाठी सर्वांच सहकार्य या ठिकाणी मी अपेक्षित करतो, येणाऱ्या निवडणुकात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे, असे आवाहन माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी केले. ते शेनवडी (ता.खटाव) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील बोलत होते.
यावेळी प्रदिप विधाते, नंदकुमार मोरे, प्रा. बंडा गोडसे, संदिप मांडवे, सी. एम. पाटील, जितेंद्र भोसले, सुरेश पाटील, संतोष घार्गे, अनिल माने, विलास शिंदे, सचिन माने, संभाजी थोरात, भाऊसो लादे, श्रीरंग पिसाळ, अरुण दबडे, भिमराव घोडके, दादासो कदम,
महादेव माने, बापूसो माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्केट कमिटीचे माजी सभापती सी. एम. पाटील म्हणाले की, शेनवडी गावामध्ये माळी मळ्यात बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन, बाजार चौकामध्ये बाजार तळाचे उद्घाटन, शेनवडी – भूषणगड रस्ता, शेनवडी – म्हासुर्णे रस्ता, शेनवडी- चोराडे रस्ता, शेनवडी- रहाटणी रस्ता, शेनवडी- होळीचा गाव रस्ता या रस्त्यांचे उद्घाटन, चव्हाण मळा रस्ता भूमिपूजन, मुस्लिम समाज सभागृहाचे उद्घाटनासह अनेक कामे मार्गी लागली असुन पुसेसावळी जिल्हा परिषद गटामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे आमदार साहेबांमुळे मार्गी लागलेली आहेत. त्यामुळे येणार्या काळातील निवडणुकामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या मागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे.
या कार्यक्रमास सरपंच ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच बबन माळी,सागर पाटील, सुभाष कोकाटे, बबन घोडके, करीम मुलानी लक्ष्मण चव्हाण, पोपट कुंभार, पंढरीनाथ कोकाटे, शिवाजी रसाळ, जालिंदर तांबोळी, आकाश पाटील शंकरराव खापे, विठ्ठल डांगरे, चंद्रकांत माने, गणपत डांगरे, अभिमन्यू गंधाले, शरद देसाई, इस्माईल पटेल, अरविंद मगर, नेताजी सरनोबत, लहू जाधव, जयवंत सरनोबत बांधकाम उपअभियंता शहाजी देसाई, शाखा अभियंता एस.व्ही. पवार,शाखा अभियंता कुलकर्णी आदीसह या कार्यक्रमास पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.